31 हजारांचा मुद्देमाल जप्त ; पोलिस उपअधीक्षक गजानन राठोड यांच्या पथकाची कारवाई
भुसावळ- शहरातील इंदिरानगर भागातील जुन्या पडित विहिरीजवळ जुगाराचा अड्डा सुरू असल्याची गुप्त माहिती पोलिस उपअधीक्षक गजानन राठोड यांना मिळाल्यानंतर स्वतः त्यांच्यासह पथकाने टाकलेल्या छाप्यात आठ जुगारींना अटक करण्यात आली तर 31 हजार 450 रुपयांच्या मुद्देमालासह व जुगाराचे साहित्य जप्त करण्यात आले. मंगळवारी, पहाटे साडेतीन वाजेच्या सुमारास झालेल्या या कारवाईनंतर जुगार्यांमध्ये खळबळ उडाली आहे.
या जुगार्यांना पोलिसांनी केली अटक
आरीफखान तायर खान (40, रा.दीनदयाल नगर), आरीफ शेख हमीद शेख (29 रा.दीनदयाल नगर), गणेश श्यामराव वाधवाणी (50, रा.सिंधी कॉलनी), युसूफ इमाम गवळी (40, रा.शिवपूर-कन्हाळा रोड), मोबीन शेख अब्दुल रफिक अब्दुल (26, आगवाली चाळ), जावेद छब्बू तडवी (35, रा.मिल्लत नगर), शेख आरीफ शेख रज्जाक (38, रा.मोहम्मदी नगर), अकिल शेख अफसर शेख (18, जाम मोहल्ला, भुसावळ) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत. आरोपींच्या ताब्यातून सहा मोबाईल, 18 हजार 650 रुपयांची रोकड तसेच जुगाराच्या साधनांसह 34 हजार 450 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
यांनी केली कारवाई
ही कारवाई पोलिस उपअधीक्षक गजानन राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली बाजारपेठ पोलिस निरीक्षक देविदास पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक मनोज ठाकरे, सहाय्यक फौजदार अंबादास पाथरवट, हवालदार सुनील जोशी, विकास सातदिवे, शंकर पाटील, भूषण चौधरी, विशाल सपकाळे, अविनाश पाटील, संकेत झांबरे, भूषण लाड, विशाल सपकाळे, अविनाश पाटील, भूषण चौधरी, बंटी कापडणे आदींच्या पथकाने केली. आरोपींविरूद्ध संकेत झांबरे यांच्या फिर्यादीनुसार बाजारपेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला तर मंगळवारी आरोपींची जामिनावर सुटका करण्यात आली.