भुसावळात जुगाराचा डाव उधळला :  6 जुगारी जाळ्यात

0
भुसावळ :  शहर पाेलिस ठाण्याच्या हद्दितील पंचमुखी हनुमान मंदीराजवळील लक्ष्मी अॅटाे गॅरेजच्या बंद खाेलीतील जुगाराचा डाव उधळत सहा जुगारीना अटक करण्यात आली.
दहा हजाराच्या राेकडसह जुगाराचे साहित्य, तीन माेटार सायकली, सहा माेबाईल असा एकुण १ लाख ४८ हजार ६२० रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. डीवायएसपी गजानन राठाेड यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक फाैजदार दिलीप काेळी, हवालदार साहील तडवी, संजय पाटील, प्रदीप पाटील, शंकर पाटील, भूषण चाैधरी, साेपान पाटील यांच्या पथकाने ही कारवाई केली. काना अनिल अग्रवाल, अकबर गवळी, मिलीद सुरेश निकम, महेद्र अानंदा पाटील, वसीम रज्जाक तडवी, अकील भिकारी चाैधरी यांना अटक करण्यात आली. हवालदार शंकर पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सहा जणांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला.