भुसावळात जुगारावर छापा ; सहा जणांना अटक

0

भुसावळ- शहरातील राहुल नगर भागात जुगाराचा डाव रंगात आला असताना बाजारपेठ पोलिसांनी छापा टाकून सहा जणांना अटक केली. 8 रोजी रात्री 12.30 वाजेच्या सुमारास झालेल्या कारवाईनंतर जुगार्‍यांमध्ये खळबळ उडाली आहे. बाजारपेठ पोलिस निरीक्षक देविदास पवार यांना शहरातील राहुल नगर भागात काही इसम झना-मन्ना नावाचा जुगार खेळत असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी धाड टाकून सहा जणांना अटक केली. आरोपींच्या ताब्यातून एक हजार 720 रुपयांची रोकड व जुगाराचे साहित्य जप्त करण्यात आले.

या आरोपींना केली अटक
अटकेतील आरोपींमध्ये विकास उर्फ झाग्या प्रकाश पाटील, धर्मसिंग उर्फ गोलू, रायसिंग पंडित, अनिल दामू कचबे, प्रकाश रमेश भालेराव, रोहिदास पंडित कसबे व संजय वेढू सोनवणे (रा.राहुल नगर, भुसावळ) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत. ही कारवाई बाजारपेठ पोलिस निरीक्षक देविदास पवार यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक दत्तात्रय गुळींग, हवालदार सुनील जोशी, विकास सातदिवे, समाधान पाटील, बापूराव बडगुजर, बंटी कापडणे आदींच्या पथकाने केली. तपास हवालदार सुनील जोशी करीत आहेत.