भुसावळात डीआयसीपीडीतर्फे मुख्याध्यापकांचे उद्बोधन

0

भुसावळ- शहरातील यावल रोडवरील सेंट अलॉयसीस स्कूलमध्ये मंगळवारी डीआयसीपीडीतर्फे मुख्याध्यापकांचा उद्बोधन वर्ग प्राचार्य डॉ.गजानन पाटील आणि डॉ.राजेंद्र महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली झाला. या प्रबोधन वर्गात यावलसह रावेर, मुक्ताईनगर, भुसावळ जामनेर तालुक्यातील सुमारे 200 वर मुख्याध्यापक उपस्थित होते.

चार सत्रात मुख्याध्यापकांना प्रबोधन
चार सत्रात मुख्याध्यापकांनी मान्यवरांनी मार्गदर्शन केले. प्रथम सत्रात एस.पी.भिरुड, द्वितीय सत्रात एन.एच.चौधरी, तृतीय सत्रात आर.आर.खोरखेडे, चतुर्थ सत्रात सत्यनारायण वैष्णव यांनी मार्गदर्शन केले. प्रास्ताविक व सूत्रसंचालन सत्यनारायण वैष्णव यांनी केले. विविध विषयाच्या शिक्षकांनी आपापसात समन्वय साधणे, सद्यस्थिती लक्षात घेणे, एकत्रीतरीत्या नियोजन करण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. दिद्वतीय सत्रात अध्ययन निष्पत्ती साधण्यात मुख्याध्यापकांची भूमिका, जबाबदारी, कर्तव्य सांगण्यात आले तर तृतीय सत्रात प्रत्यक्ष विद्यार्थ्यांना प्रगत करण्यासाठी कोणते प्रयत्न करावे याविषयी मार्गदर्शन करण्यात आले. अंतिम सत्रात मुख्याध्यापकांनी शिक्षण अध्यापन करून विद्यार्थ्यांनी अध्ययन निष्पत्ती किती प्रमाणात साध्य केली? त्याचे मूल्यमापन कसे करावे ? याविषयी मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी संजय गायकवाड, नाविद खाटीक, देवानंद वाघधरे, लीलाधर पाटील,भगवान कांबळे यांनी प्रशिक्षणाचे काम पाहिले.