भुसावळ- 1 जुलै डॉक्टर डे चे औचित्य साधून रोटरी क्लब ऑफ भुसावळ रेल सिटी, आयएमए, भुसावळ व आयडीए, भुसावळ यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच धन्वंतरी ब्लड बँक यांच्या सहकार्याने आयएमएहॉलमध्ये रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. शिबिरात 42 दात्यांनी रक्तदान केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी रोटरी रेल सिटीचे सोनू मांडे, डॉ.मकरंद चांदवडकर, आयएमएचे डॉ.एस.एम.पाटील, डॉ मिलिंद धांडे, आयडीएचे डॉ.विजय ढाके व डॉ.पराग पाटील तसेच रो. जीवन चौधरी, विनायक फालक, अमित भडंग, अनिकेत पाटील, संदीप सुरवाडे, नितीन नंदवने, संदीप जोशी, मंगेश यावलकर, विकास पाचपांडे, विशाल ठोके,सागर वाघोदे, डॉ.नितीन दावलभक्त यांनी परीश्रम घेतले.