भुसावळ- शहरातील भिरूड कॉलनीतील रहिवासी शारदा विनोद माळी (18) या तरुणीने गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना सोमवारी सकाळी सात वाजेच्या सुमारास उघडकीस आली. आत्महत्येचे कारण कळू शकले नाही. शहर पोलिस ठाण्यात याप्रकरणी आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. या घटनेची माहिती मिळताच शहर पोलिस ठाण्याचे सहायक फौजदार दत्तात्रय चौधरी, हवालदार अनिल चौधरी यांनी घटनास्थळी धाव घेतली. गळफास घेतलेल्या युवतीचा मृतदेह पोलिसांनी खाली उतरवीत घटनास्थळाचा पंचनामा केला. याप्रकरणी मनोज चुडामण पिंगळे यांनी दिलेल्या खबरीनुसार शहर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. युवतीच्या आत्महत्येचे कारण कळू शकले नाही. पोलिसांना चिठ्ठी वगैरे काहीही मिळाली युवतीच्या वडीलांचे गेल्याच वर्षी निधन झाले आहे. मयत तरुणाच्या पश्चात तीन बहिणी व दोन भाऊ असा परीवार आहे. हवालदार साहील तडवी अधिक तपास करीत आहे.