भुसावळात तलवारीच्या धाकावर दहशत : एकास अटक

0

भुसावळ- शहरातील शहरातील वांजोळा रोड भागात तलवारीच्या धाकावर दहशत निर्माण करणार्‍या निलेश प्रभाकर वारके (30, रा.संमती नगर, भुसावळ) यास बाजारपेठ पोलिसांनी अटक करीत त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. पोलिस उपअधीक्षक गजानन राठोड, बाजारपेठ पोलिस निरीक्षक देविदास पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हवालदार सुनील जोशी, कॉन्स्टेबल विकास सातदिवे, कॉन्स्टेबल संदीप परदेशी, कॉन्स्टेबल सचिन चौधरी आदींनी ही कारवाई केली.