भुसावळ : शहरातील मुस्लीम कॉलनी भागातील तरुणाकडे तलवार असल्याची माहिती बाजारपेठ पोलिसांना मिळाल्यानंतर पोलिसांनी शुक्रवारी रात्री 10.15 वाजेच्या सुमारास कारवाई करीत 800 रुपये किंमतीची लोखंडी तलवार जप्त केली. या प्रकरणी पोलिस कर्मचारी सचिन चौधरी यांच्या फिर्यादीनुसार संशयीत आरोपी मुजम्मील शाह शकील शाह (24, रा.मुस्लीम कॉलनी, भुसावळ) याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास हवालदार विजय नेरकर करीत आहेत.