भुसावळात तलवार बाळगली : एकास अटक

0

भुसावळ- शहरातील महात्मा फुले नगरात एक जण तलवारीच्या धाकावर दहशत निर्माण करीत असल्याची माहिती शहर पोलिसांना मिळाल्यानंतर संशयीत मनोज गोपाळ पारधे (52) यास अटक करण्यात आली. आरोपीच्या ताब्यातून दोनशे रुपये किंमतीची व दोन फूट आठ इंच लांबीची तलवार जप्त करण्यात आली. या प्रकरणी पोलीस नाईक कमलाकर बागुल यांनी शहर पोलिसात दिलेल्या फिर्यादीनुसार आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. तपस प्रभारी पोलीस निरीक्षक दीपक गंधाले यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.