विद्यार्थ्यांनी काढली वृक्ष दिंडी ः पर्यावरण संवर्धनाचा केला जागर
भुसावळ- शहरातील ताप्ती पब्लीक स्कूलमध्ये विद्यार्थ्यांनी वृक्ष दिंडी काढत पर्यावरण संवर्धनाचा जागर केला. ‘झाडे लावा, झाडे जगवा’ ‘पाणी अडवा, पाणी जिरवा’, रान हे हिरवे हिरवे रान हे’, ’झाडे लावा पृथ्वी वाचवा’ अशा घोषणा दिल्या. रॅलीत शाळेतील पाचशे विद्यार्थी सहभागी होते. स्काऊट-गाईडच्या विद्यार्थ्यांच्या हातात पोस्टर्स होते. तया पोस्टर्सवर वृक्षासंबधी माहिती होती. प्रसंगी विद्यालयाच्या आवारात वृक्षारोपणही करण्यात आले. ताप्ती पब्लीक स्कुलच्या प्राचार्य नीना कटलर यांनी विद्यार्थ्याना मार्गदर्शन करताना म्हणाल्या की, प्रत्येकाने त्यांच्या घरासमोर किमान दोन झाडे लाऊन त्यांना वाढविले पाहिजे. झाडे ही काळाजी गरज असून दिवसागणित जंगल तोड होऊन झाडे नष्ट होत आहेत. झाडे नसतील तर भविष्यात प्यायलाही पाणी मिळणार नाही. झाडे लावा व शोष खड्डा खणून त्यात पावसाचे पाणी जिरवा, झाडे लावा व पृथ्वी वाचवा असा संदेश त्यांनी विद्यार्थ्यांना दिला. शाळेच्या परीसरात विद्यार्थ्यांनी शिसम, गुलमोहर, चिंच, बदाम, शेवगा, लिंब सह शेकडो झाडे विदयार्ध्यानी लावले. यावेळी पॅट्रेशिया हॅसेट, रितू देसाई, वर्षा काळे, अनिस खान, श्रद्धाली घुले,गोपाल जोनवाल, विजय संकत, पंकज तिवारी,अनिता कोळी, मंजूषा नाफडे, लीना फालक , संध्या बनसोड आदी उपस्थित होते.