भुसावळात तिकीट निरीक्षकासह एकाचा मोबाईल लांबवला

0

भुसावळ- शहरात गुन्हेगारांनी डोकेवर काढले असून धूम स्टाईल मंगळसूत्र लांबवण्याच्या प्रकारासोबतच आता नागरीकांकडील मोबाईलही लांबवले जात असल्याने नागरीकांमध्ये भीती पसरली आहे. शहरातील तिकीट निरीक्षकासह एकाचा महागडा मोबाईल 30 रोजी रात्री अज्ञात चोरट्यांनी लांबवल्याप्रकरणी शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. पहिली तक्रार प्रदीप विश्‍वनाथ चौधरी (41, रामानंद लॉनजवळ, भुसावळ) यांनी दिली. 30 रोजी रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास लोणारी मंगल कार्यालयाजवळून अज्ञात आरोपींनी त्यांचा 14 हजार रुपये किंमतीचा मोबाई लांबवला तर दुसर्‍या घटनेत तिकीट निरीक्षक प्रवीण जयप्रकाश मिश्रा (30, सोहम अपार्टमेंट, भुसावळ) हे लाल चर्चजवळून जात असताना त्यांचा अज्ञात आरोपींनी 23 हजार रुपये किंमतीचा मोबाईला लांबवला. दोन्ही गुन्ह्यांचा तपास हवालदार साहिल तडवी व शंकर पाटील करीत आहेत.