भुसावळ : शहरातील कोरोनाची वाढती रुग्ण संख्या लक्षात घेता मंगळवारी 235 नागरीकांचे तर बुधवारीदेखील शहरातील सिंधी कॉलनीत 250 नागरीकांचे तर भुसावळातील नगरपालिका दवाखान्यात 38 नागरीकांचे स्वॅब घेण्यात आले होते तर तिसर्या दिवशी गुरुवारीदेखील 182 नागरीकांचे स्वॅब घेण्यात आल्याची माहिती पालिकेच्या वैद्यकीय अधिकारी डॉ.किर्ती फलटणकर यांनी दिली. गेल्या तीन दिवसात शहरातील 705 नागरीकांचे स्वॅब घेण्यात आले आहेत. सुमारे दिड महिन्यांपेक्षा अधिक काळापासून शहरात दररोज सातत्याने कोरोनाबाधीतांची संख्या वाढत असल्याने प्रशासनावरील ताण वाढला आहे तर भुसावळकरांची देखील चिंता वाढली आहे. या पार्श्वभूमीवर आरोग्य विभागातर्फे मंगळवार ते गुरुवारी दरम्यान रॅण्डमली स्वॅब घेण्यास सुरुवात करण्यात आली.
तीन दिवसात 705 नागरीकांचे घेतले स्वॅब
शहरातील म्युन्सीपल स्कूलमध्ये पंचशील नगर, शनी मंदिर वॉर्ड आणि गंगाराम प्लॉट या भागातील 198 नागरीकांचे मंगळवारी स्वॅब घेण्यात आले होते तर खडका रोड भागातील 37 नागरीकांचे स्वॅब घेतल्यानंतर दुसर्या दिवशी बुधवारी शहरातील सिंधी कॉलनी परीसरातील 200 नागरीकांचे तर भुसावळ नगरपालिका दवाखान्यात 38 नागरीकांचे स्वॅब घेण्यात आल्यानंतर गुरुवारीदेखील शहरातील समता नगरासह फालक नगरात 182 नागरीकांचे स्वॅब घेण्यात आले. याकामी खाजगी पॅथॉलॉजी लॅबचे नागेश सुरवाडे व सचिन धाइंजे यांचे तसेच स्थानिक नगरसेवकांचे सहकार्य लाभल्याचे डॉ.फलटणकर म्हणाल्या.