भुसावळ- ट्री कटींगच्या कामासाठी सोमवारी सकाळी आठ ते दुपारी तीन वाजेपर्यंत तब्बल सात तास वीजपुरवठा खंडीत करण्यात आल्याने शहरातील दक्षिण भागातील नागरीकांनी तीव्र संताप व्यक्त केला. वीज कंपनीतर्फे विकास कॉलनी फिडरवर महावितरणने मान्सूनपूर्व कामांसाठी कोणत्याही प्रकारची पूर्वसूचना न देता वीजपुरवठा खंडीत केल्याचा प्रकार पुन्हा घडल्याने नाराजी व्यक्त करण्यात आली.
मान्सुनपूर्व कामांसाठी वीजपुरवठा खंडित
महावितरण कंपनीने मान्सुनपूर्व कामासाठी वीजपुरवठा खंडित करावयाचा असल्यास पूर्वसूचना देणे गरजेचे आहे सोमवारी शहरातील दक्षिण भागातील जामनेर रोडवरील आनंद नगर फिडरवर वीज तारांना स्पर्श करणार्या झाडाच्या फांद्या छाटण्याचे काम केले. या कामासाठी सकाळी आठ वाजता वीजपुरवठा खंडीत करण्यात आला. जामनेर रोडवरील विकास कॉलनी, नाहाटा महाविद्यालय परिसर, दिनदयाळनगर, बद्रीप्लॉट, सिंधी कॉलनी, आनंदनगर, गंगाराम प्लॉट आदींसह अन्य भागांचा वीजपुरवठा सात तास खंडीत असल्याने नागरीकांनी संताप व्यक्त केला.