भुसावळात दरोडा : प्राचार्य पत्नीच्या प्रकृतीत सुधारणा

0

भुसावळ- शहरातील संत गाडगेबाबा अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.आर.पी.सिंह यांच्या निवासस्थानी पडलेल्या धाडसी दरोड्यानंतर पोलीस यंत्रणा कामाला लागली आहे. हल्ल्यात जखमी झालेल्या मोलकरणीने दिलेल्या वर्णनावरून संशयीताचा तालुका पोलीस ठाण्यासह जळगाव स्थानिक गुन्हे शाखेचे पथक सून शोध घेत आहेत तर हल्ल्यात जखमी झालेल्या प्राचार्य पत्नी शकुंतला राजेंद्रसिंह (58) यांना रुग्णालयातून डिस्जार्च देण्यात आला आहे. दरम्यान, दरोडेखोरांना कुठलाही ऐवज लांबवला नसल्याची माहिती प्राचार्य सिंग यांनी दिली. श्री संत गाडगेबाबा अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य सिंह यांच्या निवास्थस्थानी शनिवारी सकाळी दरोडा पडला होता. हल्लेखोराने प्राचार्य पत्नी शकुंतला व घरातील मोलकरीण रत्ना तायडेवर लोखंडी हातोडीने हल्ला केल्याने दोन्ही जण गंभीर जखमी झाल्या होत्या. यावेळी चोरट्याने गोदरेज कपाटात उघडले मात्र त्यात कुठलाही ऐवज नसल्याने चोरट्याला खाली हात माघारी परतण्याची वेळ आली. दरम्यान, गंभीर जखमी असलेल्या शकुंतला सिंह व रत्ना तायडे या दोन्ही महिला रूग्णांना हॉस्पीटलमधून घरी सोडण्यात आले.