भुसावळ- विविध मागण्यांसाठी शहर व तालुक्यातील दिव्यांग बांधवांनी प्रांताधिकारी कार्यालयासमोर सोमवारी लाक्षणिक धरणे आंदोलन केले. शासनाने मागण्यांच्या पूर्ती करावी, अशी मागणी दिव्यांग बांधवांनी करीत घोषणाबाजी केली. अपंग बांधवांसाठी पाच टक्के निधी खात्यात जमा करावा, घरकुल योजनेचा लाभ तातडीने अपंग बांधवांना देण्यात यावा, संजय गांधी योजनेच्या बँक खात्याची मिनिअम रक्कम शून्य करावी, अंत्योदय योजनेचा लाभ मिळावा, अपंग विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळावी, नगरपालिकेची जागा अपंगांना व्यवसायासाठी मिळावी, अपंग बांधवांना बँक कर्ज उपलब्ध करून द्यावे तसेच अपंग बांधवांना पालिकेच्या करात सवलत मिळावी आदी मागण्यांसाठी लाक्षणिक धरणे आंदोलन करण्यात आले.
यांचा धरणे आंदोलनात सहभाग
धरणे आंदोलनात अकबर अहेमद शेख, शेख इद्रीस बागवान, शेख वसीम बागवान, निलम सोनपुरे, रमेश लोढवाल, अहमद कासम गवळी, कौतीक नन्नवरे, सचिन भुई, दिनेश मोची, महेंद्र चोपडे, हरी भोळे, अकिल शेख गफ्फार, मुश्ताक खान, सत्तार खान यांच्यासह अनेकांचा सहभाग होता.