भुसावळ- मद्यधूंद दुचाकीस्वाराने धडक दिल्याने लोहमार्गचे उपनिरीक्षक शेख शब्बीर शेख गुलाम (52, रेल्वे पोलीस लाईन, भुसावळ) जखमी झाले. 29 रोजी रात्री सव्वा आठ वाजता अमर स्टोअर्सजवळ ही घटना घडली. शेख शब्बीर हे दुचाकीने जात असताना संशयीत आरोपी राजेश धर्मा शिरसाठ (38, सरस्वती नगर, भुसावळ) यांनी दुचाकी (एम.एच.19 सी.के.8044) ने जोरदार धडक दिली. या अपघातात शेख शब्बीर जखमी झाले. शिरसाठ हे मद्यधूंद असल्याचे बाजारपेठ पोलिसात दिलेल्या तक्रारीत नमूद आहे. हवालदार लतीफ शेख तपास करीत आहेत.