भुसावळात दोन हॉटेलसह तार ऑफिसरोडवरील तीन मालमत्ता सील
मार्च एण्डच्या पार्श्वभूमीवर भुसावळात पालिकेकडून वसुलीसाठी धडक कारवाई
भुसावळ : मार्च एण्डच्या पार्श्वभूमीवर तब्बल 40 कोटींच्या थकबाकी वसुलीसाठी पालिका प्रशासनाने कंबर कसली आहे. मालमत्ता, पाणीपट्टी तसेच विविध करांच्या वसुलीसाठी पालिका पथकाकडून थेट व्यापारी गाळे सील केले जात असल्याने थकबाकीदारांमध्ये खळबळ उडाली. सोमवारी दिवसभरात हॉटेल रंगोली, हॉटेल साई पॅलेस, तार ऑफिस रोडवरील ज्ञानदेव रीर झोपे आदी गाळ्यांना सील ठोकल्याने शहरात खळबळ उडाली. दरम्यान, सोमवारी तीन व्यावसायीकांकडून पालिकेने 17 लाख 10 हजार 461 रुपयांची चेकद्वारे वसुली केली.
थकबाकी न भरल्याने टेरेस केले सील
तार ऑफिस रोडवरील गाळे मालक ज्ञानदेव हरि झोपे यांच्याकडे 10 लाख 24 हजार 786 रुपयेे थकल्याने गाळ्याला सील लावण्या आले तसेच नारायण गोविंदमल नागदेव यांच्या हॉटेल रंगोलीचे 11 लाख 3 हजार 962 रुपये तसेच हॉटेल साई पॅलेसचे 13 लाख 14 हजार 969 रुपये थकीत कर व टेरेस भाड्यापोटी सील करण्यात आल्याने राजकीय गोटात खळबळ उडाली.
यांच्या पथकाने केली कारवाई
ही कारवाई मुख्याधिकारी संदीप चिद्रवार यांच्या मार्गदर्शनाखाली उपमुख्याधिकारी महेंद्र कातोरे, मालमत्ता व संकिर्ण विभाग प्रमुख रामदास म्हस्के, कर लिपिक लोकेश ढाके, लिपिक गोपाळ पाली, अनिल भाकरे, राजू चौधरी, मोहन भारंबे, राजेंद्र चौधरी, जयकुमार पिंजाणी, राजेंद्र कोळी आदींच्या पथकाने ही कारवाई केली.