भुसावळ- वरणगावकडून जळगावकडे धान्य वाहून नेणारा भरधाव ट्रक (एम.एच.19 झेड.6262) उलटल्याची घटना गुरुवारी दुपारी दोन वाजेच्या सुमारास राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावरील हॉटेल सुहासजवळ घडली. सुदैवाने या अपघातात कुणीही जखमी झाले नसल्याचे सूत्रांनी सांगितले. बाजारपेठ पोलिसात मात्र ट्रकच्या अपघाताबाबत कुठलीही नोंद नसल्याचे पोलिस सूत्रांनी सांगितले.