भुसावळात धूम स्टाईल मंगळसूत्र चोरी ; आरोपी जाळ्यात

0

भुसावळ- धूम स्टाईल येत विवाहितेच्या गळ्यातील मंगळसूत्र लांबवणार्‍या चोरट्याच्या बाजारपेठ पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. सचिन भीमराव वाघ (28, रा.खडका, ता.भुसावळ) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे. 13 जुलै 2018 रोजीतक्रारदार विवाहिता चारुशीला शैलेश बिसे (रा.गडकरी नगर, भुसावळ) सकाळी पावणेआठ वाजेच्या सुमारास गडकरी नगर भागातून पायी चालत असताना दुचाकीवरून आलेल्या दोघांनी 60 हजार रुपये किंमतीचे मंगळसूत्र लांबवले होते. या प्रकरणी बाजारपेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा तपास सुरू असताना बाजारपेठ पोलिस निरीक्षक देविदास पवार यांना गुन्ह्यातील आरोपी खडका येथे आल्याची गुप्त माहिती मिळाल्यानंतर त्यास अटक करण्यात आली. पोलिस उपनिरीक्षक मनोज ठाकरे, पोलिस नाईक किशोर महाजन, कॉन्स्टेबल विकास सातदिवे आदींनी ही कारवाई केली.