भुसावळ:– धूम स्टाईल येत दुचाकीस्वार तिघांनी मोबाईलवर बोलत असलेल्या इसमाच्या हातातील मोबाईल लांबवल्याची घटना 3 माार्च रोजी शहरातील श्री हरी मंदिर, लक्ष्मी नारायण नगरात घडली. तक्रारदार पुष्कर विजयकुमार धुप्पड (गायत्री शक्तीपीठ, पुरूषोनगर, फालक बिल्डींग, भुसावळ) हे 3 रोजी रात्री पावणे दहा ते दहा वाजेच्या सुमारास मोबाईलवर बोलत असताना दुचाकी (एम.एच.19 डीबी 5210) वरून आलेल्या अज्ञात तिघांनी धुप्पड यांच्या हातातील आठ हजार रुपये किंमतीचा मोबाईल अलगद लंपास केला. धुप्पड हे शैक्षणिक कामासाठी पुणे येथे गेल्याने ते भुसावळात परतल्यानंतर त्यांनी तक्रार दिल्यावरून बाजारपेठ पोलिसात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. तपास उपनिरीक्षक अनिस शेख करीत आहेत.