भुसावळात नगरसेवक पिंटू ठाकूर यांच्या प्रयत्नाने गॅस संचाचे वाटप

0

घरा-घरात पोहोचवा उज्ज्वला गॅस योजना -आमदार संजय सावकारे

भुसावळ- पूर्वी महिला चुलीवर स्वयंपाक करीत असल्याने त्यांना डोळ्यांचे अनेक आजार उद्भवत होते मात्र आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘सबके के सबका विकास’ हे धोरण अवलंबल्यामुळे देशभरात उज्ज्वला गॅस योजना राबविण्यात येत आहे. ही योजना भुसावळ शहर व तालुक्यातील जास्तीत-जास्त लाभार्थीपर्यंत पोहोचवावी, असे आवाहन आमदार संजय सावकारे यांनी येथे केले. शहरातील जामनेर रोडवरील प्रभाग क्रमांक 20 मधील लाभार्थींना नगरसेवक महेंद्रसिंग (पिंटू) ठाकूर यांच्या पुढाकाराने गॅस संचाचे वाटप करण्यात आले. याप्रसंगी आमदार सावकारे बोलत होते. या योजनेमुळे वृक्षतोडीस आळा बसल्याचेही ते म्हणाले.

यांची होती उपस्थिती
या कार्यक्रमास उपनगराध्यक्ष लक्ष्मी रमेश मकासरे, नगरपालिका गटनेते हाजी मुन्ना तेली, माजी उपनगराध्यक्ष तथा नगरसेवक युवराज लोणारी, नगरसेवक तथा भाजपा सरचिटणीस प्रा.डॉ.सुनील नेवे, नगरसेवक किरण कोलते, माजी नगरसेवक रमाकांत महाजन, नगरसेवक महेंद्रसिंग ठाकूर, दिनेश नेमाडे आदी उपस्थित होे.

फुलगाव येथेही लाभार्थींना गॅसचे वाटप
भुसावळ- तालुक्यातील फुलगाव येथे उज्वला गॅस योजनेंतर्गत प्रतिष्ठा महिला मंडळाच्या अध्यक्षा रजनी संजय सावकारे यांच्या हस्ते गॅस वाटप करण्यात आले. डॉ.मृणाल पाटील, अर्चना सोनवणे, सारीका यादव, प्रतिष्ठा महिला मंडळाच्या सदस्या श्रद्धा चौधरी, फुलगाव सरपंचा वैशाली टाकोळे, हेमलता शिंदे, गायत्री चौधरी, ग्रामपंचायत सदस्या कल्पना पाटील यांच्या हस्ते 25 लाभार्थींना गॅस वाटप करण्यात आले. यावेळी नरेंद्र मोदी विचारमंचचे भुसावळ तालुकाध्यक्ष नारायण कोळी, वर्षा गॅस एजंसीचे व्यवस्थापक विजय पाथरवट यांच्यासह लाभार्थी उपस्थित होते. प्रास्ताविक प्रभाग क्रमांक 20 चे नगरसेवक तथा कार्यक्रमाचे आयोजक महेंद्रसिंग ठाकूर यांनी केले. ते म्हणाले की, प्रभागाचा विकास करण्यासाठी आपण कटीबद्ध असून या योजनेंतर्गत अधिकाधिक लाभार्थींना लाभ घ्यावा तसेच कार्यकर्त्यांनी या योजनेतील तळागाळातील लाभार्थींना लाभ मिळण्यासाठी प्रयत्न करावा, असे आवाहनही त्यांनी केले.