शोभायात्रा मिरवणुकीने वेधले लक्ष
भुसावळ- हिंदू नववर्षाचे स्वागत करण्यासाठी जगदगुरू नरेंद्राचार्य महाराज भक्त सेवा मंडळ जळगाव पूर्व विभागातर्फे शहरातून शोभायात्रा काढण्यात आली. देना नगरातील काशी विश्वनाथ मंदिरापासून शोभायात्रेला सुरुवात झाली. शोभायात्रेत जिल्हाभरातील नरेंद्राचार्य महाराजांचे पाच हजारांवर भक्त सहभागी झाले. शोभायात्रेच्या अग्रभागी भव्य गुढी, संत गजानन महाराजांसह भारत माता, ज्ञानेश्वर माऊलींचा सजीव देखावा, युवतींचे दांडिया पथक, कलशधारी महिला सहभागी झाल्या होत्या. यशस्वीतेसाठी अमोल कुलकर्णी, डॉ.नामदेव बोरसे, मधुकर जावळे, सुनील पाटील आदींनी परीश्रम घेतले.