भुसावळात नाल्याच्या पाण्यातून वृक्षांना जीवदान

0

प्रतिष्ठा महिला मंडळाचा स्तुत्य उपक्रम ; बलबल काशी नाल्यातील सांडपाण्याचा पुर्नवापर य जागतिक पर्यावरणदिनानिमित्त वृक्षारोपण ; भुसावळातील संजनी पार्कमध्ये बहरली बाग

भुसावळ- शहरातील बलबल काशी नाल्यातून वाहून जाणार्‍या सांडपाण्यावर प्रक्रिया करून या पाण्याच्या माध्यमातून शहरातील प्रोफेसर कॉलनी परीसरातील जंगली महादेव मंदिर, संजनी पार्कमध्ये बाग बहरली आहे. जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून आमदार संजय सावकारे यांच्या हस्ते वृक्षारोपण व फिल्टर प्लांटचे लोकार्पण करण्यात आले. आमदारांच्या संकल्पनेतून प्रोफेसर कॉलनीत संजनी पार्क उभारण्यात आला आहे.

प्रतिष्ठा मंडळ व आमदारांच्या सौजन्याने बहरली बाग
मुख्यमंत्री देवेंद्र फडवणवीस यांच्या हस्ते व आमदार श्री संजय सावकारे यांच्या पुढाकाराने संजनी पार्कचे काही महिन्यांपूर्वी लोकार्पण ऑनलाईन पद्धतीने झाले होते मात्र आधीच असलेली पाण्याची कमतरता त्यातच उन्हाच्या दाहकतेमुळे उद्यानातील झाडे जगवण्याचे आव्हान उभे ठाकले असताना पार्क शेजारून बलबलकाशी नाल्यातील वाहणार्‍या पाण्याचा वापर झाडे जगवण्यासाठी होवू शकतो या विचारातून आमदारांनी पुढाकार घेतला. नाल्यातील पाण्याच शुद्धीकरणासाठी सेंड फिल्टर व कार्बन फिल्टर असे दोन फिल्टर लावण्यात आले तसेच नाल्याच्या पाणीच्या शुद्धीकरणाला आवश्यक असे सर्व उपकरण मागील दोन महिन्यांपूर्वी लावण्यात आले. गेल्या दोन महिन्यांपासून उद्यानातील झाडांना नाल्यातील फिल्टर झालेले हेच पाणी देण्यात आल्याने उद्यान बहरले आहे.

पाण्याचा करा जपून वापर -आमदार
सांडपाण्याचा पुर्नवापर करून झाडे जगवण्यात यश आल्यानंतर जागतिक पर्यावरणदिनाचे औचित्य साधून आमदार संजय सावकारे यांच्या हस्ते वृक्षारोपण तसेच फिल्टरचे लोकार्पण करण्यात आले. याप्रसंगी आमदार संजय सावकारे यांनी ‘जल है तो कल है’, असे सांगत वृक्षारोपण काळाची गरज असून हा उपक्रम सार्वजनिक ठिकाणी करण्यात आला असलातरी सर्वांनीच आपल्या घरातील सांडपाण्याचा वापर करून वृक्ष लागवड करावी तसेच टेरेस गार्डनसाठी वापरावे व पाण्याचा प्रत्येक थेंब जपून वापरणे काळाची गरज असल्याचे सांगितले.

यांची होती उपस्थिती
प्रतिष्ठा महिला मंडळाच्या अध्यक्षा रजनी सावकारे, किशोर पाटील, अजित चौधरी, अनिल चौधरी, सुनील शुक्ला, सोपान खडसे, मुरलीधर टेकाळे, भरत पिंपळे, एल.पी.पाटील, श्रध्दा चौधरी, सरला सावकारे, सपना जंगले, लीना टेकाळे, मीनाक्षी पिंपळे, वैशाली भदाणे, अर्चना सोनवणे, मनीषा काकडे, सुनंदा भारुळे, मंगला पाटील व नागरीक उपस्थित होते.