भुसावळात नास्ता विक्रेत्या युवकाची तापी नदीत आत्महत्या

0

भुसावळ- शहरातील नास्ता विक्रेता युवकाने तापी नदीत उडी घेवून आत्महत्या केल्याची घटना सोमवारी सकाळी सात वाजेच्या सुमारास उघडकीस आली. या प्रकरणी शहर पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. आत्महत्येचे कारण कळू शकले नाही. सुदामा ब्रिजमोहन अग्रवाल (28) असे मृत युवकाचे नाव आहे. अग्रवाल हे मामाजी टॉकीज जवळील हंबर्डीकर चाळीजवळील वास्तव्यास होते. मामाजी टॉकीज परीसरात नाश्त्याची गाडी चालवून उदरनिर्वाह करणार्‍या अग्रवाल यांनी आत्महत्या का केली? याचे कारण कळू शकले नाही. सुदामा अग्रवाल हे काळ्या रंगाचा बनियन आणि बरमुडा पॅन्ट घालून सुदामा यांनी तापी नदीत स्वत:स झोकून देत आत्महत्या केली. मृतदेह जिल्हा रूग्णालयात शवविच्छेदनासाठी हलविण्यात आला. तेथे शवविच्छेदन होऊन मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. मृत सुदामा याचा विवाह झाला नव्हता. सुदामा यांच्या खिश्यात काहीही चिठ्ठी मिळाली नाही. त्यामुळे त्यांच्या आत्महत्येचे कारण कळू शकले नाही. अरुण रंधे यांच्या खबरीनुसार अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. तपास पोलिस निरीक्षक बाबासाहेब ठोंबे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार मोहंमद अली सय्यद करीत आहे.