भुसावळात नियमांचे उल्लंघण : दोन दुकानांना सील

0

भुसावळ : कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर प्रांताधिकार्‍यांनी दुकानदारांना दुकाने उघडण्याचे दिवस ठरवून दिले आहेत मात्र नियमांचे उल्लंघण करून गुरुवारी दुकान उघडल्याने दोन दुकांनांना सील लावण्यात आले. त्यात जळगाव रोडवरील लक्ष्मी इंटर प्रायझेस तसेच स्टेशनरोड वरील शिवाजी इंटरप्रयझेस या दुकानाला सील लावण्यात आले. ही कारवाई उप जिल्हाधिकारी तथा मुख्याधिकारी किरण सावंत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पंकज पन्हाळे, संजय बाणााईते, सुरज नारखेडे, शे.परवेज अहमद, विशाल पाटील, राजेश पाटील, पोलीस दीपक शिंदे यांनी केली.