भुसावळात नूतन मुख्याधिकार्‍यांनी जाणल्या समस्या

0

प्रभाग क्रमांक एकचा पाहणी दौरा : समस्या सोडवण्याची ग्वाही

भुसावळ- पालिकेचे मुख्याधिकारी रोहिदास दोरकुळकर यांनी प्रभाग क्रमांक एकला भेट देऊन समस्यांची पाहणी केली तसेच नागरीकांच्या समस्याही जाणून घेतल्या. पालिका सोयी-सुविधा पुरवण्यासाठी कटीबद्ध असल्याची ग्वाही प्रसंगी मुख्याधिकार्‍यांनी दिली.
या भागांची केली पाहणी
मुख्याधिकार्‍यांनी प्रभाग क्रमांक एकमधील  मानक बाग, गजानन महाराज मंदिर परीसर, शिक्षक कॉलनी, महिला कॉलेज परीसर, राहुल नगर, शांती नगर, तापी नगर तसेच प्रभाग दोनमधील दादासाहेब रूपवते हौसिंग सोसायटीला भेट देऊन नागरीकांशी संवाद साधत त्यांच्या अडचणी समजून घेतल्या. प्रसंगी नागरीकांनी त्यांचा सत्कार केला. यावेळी उपनगराध्यक्ष लक्ष्मी रमेश मकासरे, आयपीआयचे रमेश मकासरे, प्रशांत अहिरे, नगरसेविका सविता अहिरे (मकासरे), देशपांडे तसेच पालिकेचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.