भुसावळ : रनिंग स्टाफच्या विविध न्याय मागण्यांसाठी नॅशनल रेल्वे मजदूर युनियनतर्फे सीवायएम ऑफिस गुडस् लॉबीत शुक्रवारी धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी केली. रनिंग स्टाफ कर्मचार्यांच्या रीक्त जागा भराव्यात, ट्रेन मॅनेजर (मालगाडी) यांना स्वतंत्र लाईन बॉक्स देण्यात यावे, स्पॅड केसमध्ये लोको निरीक्षकाला दंड देवू नये, लोको निरीक्षकांना स्टेपींग अप देण्यात यावे यासह विविध मागण्यांसाठी धरणे आंदोलन करण्यात आले. 19 ऑगस्टपर्यंत न्याय मागण्या सोडवण्यात आल्या नाहीत तर तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.
यांची आंदोलनात उपस्थिती
प्रदीप गायकवाड, मंडल सचिव आर.आर.निकम, सहा.मंडल सचिव इसरार खान आदींच्या उपस्थितीत धरणे आंदोलन करण्यात आले. शाखा सचिव ए.टी.खंबायत यांनी सूत्रसंचालन केले. श्याम तळेकर, असलम, ए.व्ही.अडकमोल, डी.बी.महाजन, संजय श्रीनाथ, ज्योती अडवाल, हरीमोहन मीना, एच.के.चौरसीया, के.एन.सिंग, किरण नेमाडे, सचिव वाघ, अनिल मालवीया आदी उपस्थित होते.