भुसावळात नैराश्यातून रेल्वे कर्मचार्‍याची आत्महत्या

0

भुसावळ- शहरातील रेल्वे कर्मचार्‍याने नैराश्यातून आत्महत्या केल्याची घटना बुधवारी सकाळी सात वाजेच्या सुमारास उघडकीस आली. गौतम भीमराव शिंदे (37, मोहित नगर, भुसावळ) असे मयत कर्मचार्‍याचे नाव आहे. मोहित नगरात वास्तव्यास असलेले शिंदे हे पूर्वी रेल्वे सुरक्षा बलात स्वयंपाकी म्हणून कामास होते मात्र ते अनफिट झाल्याने त्यांची रेल्वेच्या पीओएच विभागात स्टोअर्स विभागात नेमणूक करण्यात आली होती. गेल्या दोन वर्षापासून त्यांची पत्नी त्यांना सोडून गेल्याने त्यांना नैराश्यही आले होते. बुधवारी सकाळी सात वाजेपूर्वी त्यांनी मोहित नगरातील राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यांनी आत्महत्या केली यावेळी त्यांच्या घरात फक्त त्यांची आई होती.

पोलिस उपअधीक्षकांची धाव
बुधवारी पहाटेच शिंदे हे घराच्या पहिल्या मजल्याव झोपले असताना त्यांनी स्टुलवर चढत पंख्याला दोरी आवळून गळ्याला फास लावला. त्यांची आई सकाळी त्यांना उठवण्यास गेली असता ही घटना उघडकीस आली तर मुलाचा मृतदेह पाहताच आईने हंबरडा फोडला. पोलिस उपअधीक्षक गजानन राठोड, निरीक्षक रामकृष्ण कुंभार, उपनिरीक्षक नाना सूर्यवंशी यांनी घटनास्थळी जात पंचनामा केला. शिंदे यांनी आत्महत्या केली असून त्याच्या आत्महत्येचे कारण मात्र कळू शकले नाही. शिंदे यांनी आत्महत्येपूर्वी काहीही चिठ्ठी लिहून ठेवलेली नव्हती त्यामुळे त्यांनी नैराश्येतून आत्महत्या केल्याचा पोलिसांनी अंदाज आहे. शिंदे यांच्या पश्‍चात पत्नी, पाच वर्षीय मुलगा, दोन भाऊ, तीन बहिणी असा परीवार आहे. शिंदे यांचा आठ वर्षांपूर्वीच विवाह झाल्याची माहिती मिळाली. शहर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून उपनिरीक्षक सूर्यवंशी पुढील तपास करीत आहेत.