पतंजलीची स्वदेशी उत्पादने व औषधी भारताचा गौरव वाढवणारी -डॉ.हेमंत बर्हाटे
भुसावळ- शहरातील सराफा बाजारात धनत्रयोदशी व जागतिक आयुर्वेद दिनाचे औचित्य साधून पतंजली सुपरशॉपचा थाटात शुभारंभ करण्यात आला. डॉ.कमलकांत शास्त्री यांच्या हस्ते फीत कापून दुकानाचा शुभारंभ करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तालुका आरोग्याधिकारी डॉ.हेमंत बर्हाटे होते. हल्लीच्या काळात उत्पादनांची शुद्धता, औषधींची गुणवत्ता व त्यांची विविध व्याधींवर असलेली उपयुक्तता यात पतंजलीची स्वदेशी उत्पादने व औषधी भारताचा गौरव वाढवणारी असल्याचे मत डॉ.बर्हाटे यांनी व्यक्त केले.
यांची उद्घाटन कार्यक्रमास उपस्थिती
कार्यक्रमात पतंजली योग समितीचे जळगाव जिल्हाध्यक्ष हेमंत चौधरी यांनी योग समितीच्या कार्यात श्रीहरी पतंजलीच्या महेश झंवर यांच्या योगदानाचे कौतुक करीत पतंजली योग समितीच्या संपूर्ण सहयोगाचे आश्वासन दिले. सुपर शॉपमध्ये पतंजली प्रशिक्षीत एम.डी.आयुर्वेद तज्ज्ञांद्वारे केली जाणार आहे. सूत्रसंचालन दीपक अग्रवाल यांनी केले. डॉ.योगेंद्र कासट यांनी धन्वंतरी स्तवन सादर केले. कार्यक्रमासाठी नगरसेवक निर्मल (पिंटू) कोठारी, राध्येश्याम लाहोटी, अनिल जैन, बनवारीलाल अग्रवाल, गोपाल मंत्री, डॉ.संदीप जैन, नगरसेवक रमेश नागराणी, पतंजली योग समितीचे महाले, बर्हाटे, जे.एच.चौधरी, सीमा जावळे, अर्चना भगत आदींची उपस्थिती होती. कार्यक्रमास अमित अग्रवाल, नवीन अग्रवाल, ऋषभ अग्रवाल, सौरभ शर्मा, शंकर लेकुरवाळे, पूनम महाजन, श्याम तिवारी, विशाल अग्रवाल, महेंद्र चौधरी, संजय अग्रवाल, शंकर लेकुरवाळे आदींनी सहकार्य केले.