भुसावळात पती-पत्नीचे भांडण विकोपाला : पतीने घर जाळले

0

भुसावळ- पती-पत्नीत झालेले भांडण विकोपाला गेल्याने संतापाच्या भरात पतीने घरच पेटवल्याची घटना शहरातील भजे गल्लीत बुधवारी दुपारी 12 वाजेच्या सुमारास घडली. या प्रकरणी आरोपी पतीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. रोशन खान यांच्या घरात भाडेकरू करून म्हणून फिरोज खान बुढन खान व त्यांच्या पत्नी नसीम बी.राहतात. बुधवारी दुपारी दाम्पत्यात घरघुती कारणावरून झालेले भांडण विकोपाला गेल्याने आरोपीने पतीने लायटरने घर पेटवले. या घटनेत घरातील गाद्या तसेच गोदरेज कपाटातील कपडे-लत्ते आदी साहित्य जळून खाक झाले. या प्रकरणी पत्नी नसीम बी.फिरोज खान (29, रा.भजे गल्ली, जाम मोहल्ला, भुसावळ) यांच्या फिर्यादीनुसार आरोपी पती फिरोज बुढन खान उर्फ पा (भले, गल्ली, भुसावळ) विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. तपास हवालदार लतीफ शेख करीत आहेत.