भुसावळात पथसंचलनादरम्यान पोलिसांवर फुलांची उधळण

0

पोलिस जनतेसाठी रस्त्यावर : नागरीकांनी मात्र घरातच सुरक्षित राहण्याचे आवाहन

भुसावळ : महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची मंगळवारी असलेली जयंती व कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर सुरू असलेल्या संचारबंदीमुळे नागरीकांनी घरातच सुरक्षितपणे थांबण्याचे आवाहन करीत शहरात अपर पोलिस अधीक्षक भाग्यश्री नवटके यांच्या नेतृत्वात डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळा ते रजा टॉवर चौक भागात पथसंचलन करून शक्तीप्रदर्शनही करण्यात आले. याप्रसंगी जनतेसाठी कुटुंब सोडून अहोरात्र कर्तव्य निभावणार्‍या पोलिसांप्रती आदराची भावना म्हणून गौसिया नगर भागात पोलिसांवर फुलांची उधळण करण्यात आली. भुसावळकरांनी दाखवलेल्या प्रेमाने पोलिस दलही भारावले.

आरोग्यासाठी नागरीकांनी घरातच रहावे
पथसंचलनात उपविभागीय पोलिस अधिकारी गजानन राठोड, बाजारपेठचे पोलिस निरीक्षक दिलीप भागवत, शहरचे पोलिस बाबासाहेब ठोंबे, तालुक्याचे पोलिस रामकृष्ण कुंभार यांच्यासह पोलिस कर्मचारी सहभागी झाले. अपर पोलिस अधीक्षक भाग्यश्री नवटके म्हणाल्या की, कोरोनाने जगभरात हाहाःकार माजविला असून जळगाव जिल्ह्यातील नागरीरक लॉकडाऊन काळात जागरुक राहिल्याने जिल्हा कोरोनाच्या आजारापासून दुर राहिला व यापुढेही 3 मे पर्यंत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लॉकडाऊन वाढविला नागरीकांनी अशाच पद्धत्तीने सुरक्षीतरीत्या घरातच रहावे, असे आवाहनही त्यांनी केले.

गौसीया नगरात पोलिसांवर फुलांची उधळण
देशभरात कोरोनापासून नागरीकांना वाचवण्यासाठी पोलिस प्रशासन दिवसरात्र सज्ज आहे तर भुसावळातही उपविभागीय पोलिस अधिकारी गजानन राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस दलातील अधिकारी व कर्मचार्‍यांनी घरदार, कुटुंब सोडून जनतेच्या हितासाठी रस्त्यावर खडा पहारा दिला आहे त्यामुळे त्यांच्या कर्तव्याप्रती आभार मानणण्यासाठी शहरातील गौसिया नगर भागातून पथसंचलन होत असताना यंग ग्रुप तर्फे फुलांची उधळण करण्यात आले. आगामी यावेळी यंग ग्रुपचे मुक्तार मण्यार, मुस्तफा खाटीक, आबीद पिंजारी, जहांगीर मन्यार, वसीम शेख, आबीद पिंजारी, बिलाल शहा, रफिक शेख, अजीज शेख, रोशन पिंजारी, आसीफ खान, मुक्तार पटेल, इमरान शेख, जफर खान, सईद पटेल, अल्ताफ शेख, अकील शेख, इमरान मण्यार व गौसिया नगर भागातील नागरीक उपस्थित होते.