250 वृक्षांची लागवड ; पर्यावरण संवर्धन काळाची गरज -डीआरएम
भुसावळ- जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून जनजागृतीपर रॅलीसह वृक्षारोपण आदी कार्यक्रम रेल्वे विभागातर्फे घेण्यात आले. मंगळवारी सकाळी आठ वाजता डीआरएम विवेककुमार गुप्ता यांनी रॅलीस हिरवा झेंडी दाखवली. विभागीय रेल्वे व्यवस्थापक कार्यालयापासून निघालेली रॅलीचा रेल्वे मैदानाकडील रेल्वे तिकीट बुकिंग कार्यालय, हंबर्डीकर चौक, गांधी पुतळा मार्गे, रेल्वे हॉस्पिटलजवळील सेवेज वॉटर प्रक्रिया प्रकल्पाजवळ रॅलीचा समारोप झाल. यात सेवेज वॉटर प्रक्रिया प्रकल्पात विभागीय रेल्वे व्यवस्थापक विवेककुमार गुप्ता यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.
दोन लाख वृक्षारोपणाचा उद्देश -डीआरएम
डीआरम विवेककुमार गुप्ता म्हणाले की, भुसावळ विभागात येत्या पावसाळ्यात दोन लाख वृक्षांचे रोपण करण्याचा संकल्प करण्यात आला आहे. पर्यावरण संवर्धन काळाची गरज असून प्रदूषणमुक्तीसाठी सर्वांनी प्रयत्न करायला हवेत, असे आवाहनही त्यांनी केले. प्रसंगी सेवेज वॉटर प्रक्रिया प्रकल्पा 250 वृक्षांचे वृक्षारोपण करण्यात आले.
यांची होती उपस्थिती
यावेळी अपर विभागीय रेल्वे व्यवस्थापक मनोजकुमार सिन्हा, वरीष्ठ विभागीय अभियंता (पर्यावरण आणि गृह प्रबधंक) पी.रामचंद्रन, वरीष्ठ विभागीय विद्युत अभियंता जी.के.लखेरा, वरीष्ठ विभागीय अभियंता (समन्वय) राजेश चिखले, वरीष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक आर.के.शर्मा, वरीष्ठ विभागीय यांत्रिक अभियंता लक्ष्मीनारायण, वरीष्ठ विभागीय संरक्षा अधिकारी एन.के.अग्रवाल, वरीष्ठ विभागीय कार्मिक अधिकारी एन.डी.गांगुर्डे, भुसावळ रेल्वे स्थानक संचालक जी.आर.अय्यर, अनंत झोपे, संतोष श्रीवास उपस्थित होते. दरम्यान, रेल्वेच्या रॅलीत रेल्वे स्काउट गाईडचे विद्यार्थी तसेच सर्व अधिकारी व कर्मचारी सहभागी झाले.