भुसावळ- शहरातील हंबर्डीकर चौकात (पाणी गेट) शुक्रवारी दुपारी 4.30 वाजेच्या सुमारास काली नावाने ओळख असलेल्या अनोळखी व्यक्तीचा मृतदेह मिळून आला. मृत व्यक्ती हा 55 वर्षाचा असल्याचा अंदाज असून काहीतरी आजाराने त्याचा मृत्यू झाल्याचे पोलिसांनी सांगितले. या प्रकरणी शहर पोलिस ठाण्यात प्रकाश प्रदीप ठाकूर यांनी दिलेल्या माहितीवरून आकस्माक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. हवालदार लक्ष्मण महाले तपास करीत आहे.