भुसावळ- जुन्या चोर्या-घरफोड्यांचा तपास थंडबस्त्यात असतानाच एक दिवसाआड होणारी चोरी शहरवासीयांसाठी डोकेदुखी ठरत आहे. वसंत टॉकीज मागील मेथाजी मळा परिसरातील रहिवासी अशोकराय कुमूदचंद्र लायवाला हे गावाला गेल्याची संधी साधत चोरट्यांनी त्यांच्या बंद घराचे कुलूप तोडून घरातील सुमारे 30 हजार रूपयाची रोकड आणि घरातीलभ ांडे व अन्य साहित्य लांबवल्याची घटना गुरूवारी सायंकाळी सहावाजता उघडकीस आली. शहर पोलिस ठाण्यात निरीक्षक बाबासाहेब ठोंबे यांना चोरीची माहिती दिल्यानंतर रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.
बंद घरांना चोरट्यांकडून टार्गेट
अशोकराय लायवाला हे गेल्या दोन महिन्यांपूर्वी गुजराथमध्ये त्यांच्या मुलाकडे गेल्याने घराला कुलूप होते तर चोरट्यांनी संधी साधत घराचा कडीकोयंडा तोडून कपाटातील 30 हजार रूपयांची रोकड व भांडे व अन्य साहित्य सुध्दा लांबवले. लायवाला हे गुरूवारी सायंकाळी घरी आल्यानंतर चोरी उघडकीस आली.