भुसावळ– दोन दिवसांपूर्वीच शहर पोलीस ठाणे हद्दीत वृद्धेची पोत लांबवण्याची घटना ताजी असताना बुधवारी पुन्हा धूम स्टाईल येत महिलेची पर्स लांबवण्याची घटना भुसावळ शहर पोलीस ठाणे हद्दीत घडल्याने महिलांमध्ये घबराट पसरली आहे.
तक्रारदार अनिता सुनील वंजारी (हिंदू हौसिंग सोसायटी, भुसावळ) हे पतीसह पायी रेल्वे स्टेशनकडे जात असताना पोलीस लाईनच्या गेटसमोरच धूम स्टाईल आलेल्या चोरट्यांनी त्यांच्या हातातील पर्स लांबवली. पर्समध्ये पाच हजार 800 रुपये रोख व हजार रुपये किंमतीचा मोबाईल होता. चोरीचे वृत्त कळताच शहर पोलीस ठाण्याचे प्रभारी निरीक्षक दीपक गंधाले, उपनिरीक्षक के.टी.सुरळकर यांनी भेट दिली.