भुसावळात पोलिस उपअधीक्षक अॅक्शन मोडवर : मास्क न लावणार्यांसह वेळेचे उल्लंघण करणार्यांवर कारवाईचा दंडुका
भुसावळ शहर हद्दीत 10 तर बाजारपेठ पोलिस ठाणे हद्दीत सात व्यावसायीकांवर कारवाई
भुसावळ : शहरासह जिल्ह्यात कोरोनाचा विस्फोट सुरू असताना जिल्हाधिकार्यांनी मध्यरात्री संचारबंदी जारी केली असतानाही नागरीक विनाकारण बाहेर पडत असल्याने अशांविरुद्ध पोलिस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांनी धडक मोहिम उघडत शुक्रवारी रात्री 12 नंतर शहर हद्दीत 10 तर बाजारपेठ हद्दीतील सात हॉटेल्ससह अन्य व्यावसायीकांवर वेळेचे उल्लंघण केल्याने धडक कारवाई केल्याने व्यावसायीकांमध्ये खळबळ उडाली शिवाय 25 मास्क न लावणार्या नागरीकांकडून दंड वसुल करण्यात आला शिवाय विनाकारण बाहेर पडणार्या 40 दुचाकी व चारचाकी चालकांकडूनही दंड वसुल करण्यात आल्याने नागरीकांमध्ये खळबळ उडाली.
उशिरापर्यंत हॉटेल्स सुरू असल्याने कारवाई
पोलिस उपअधीक्षक वाघचौरे यांनी पालिकेच्या पथकाला सोबत शुक्रवारी रात्री 12 वाजेनंतर शहर हद्दीतील 10 व्यवस्थापनांवर मुंबई पोलिस अॅक्ट अन्वये कारवाई केली तसेच बाजारपेठ हद्दीतील सात व्यवस्थापनांवर दंडात्मक कारवाई केली तसेच मास्क न लावता बाहेर फिरणार्या 25 नागरीकांकडून जागेवरच दंड वसुल करण्यात आला शिवाय रात्री विनाकारण बाहेर फिरणार्या 40 दुचाकी व चारचाकी चालकांकडूनही दंड वसुल करण्यात आल्याने नागरीकांमध्ये मोठी खळबळ उडाली.
यांनी केली धडक कारवाई
पोलिस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली शहरचे पोलिस निरीक्षक बाबासाहेब ठोंबे, सहाय्यक पोलिस निरीक्षक धुमाळ, सहाय्यक पोलीस निरीक्षक हनुमंत गायकवाड यांच्यासह शहर वाहतूक शाखा तसेच बाजारपेठ व भुसावळ शहर पोलिस स्टेशनच्या अधिकारी व कर्मचार्यांनी कारवाईत सहभाग नोंदवला.