भुसावळात पोलिस उपनिरीक्षकाला धमकावले : संशयीत आरोपी निखील राजपूतला अखेर अटक

भुसावळ : बाजारपेठ पोलिसांचे पथक रात्रीच्या गस्तीवर असताना एका संशयीताला हटकल्यानंतर करणी सेनेचा खान्देश अध्यक्ष व पोलिसांच्या रेकॉर्डवरील कुविख्यात निखील राजपूत याच्यासह टोळक्याने बाजारपेठ पोलिस ठाण्याच्या उपनिरीक्षकालाच जीवे ठार मारण्याची धमकी देत मारहाण केल्याची संतापजनक घटना शहरातील श्रीराम नगराजवळील हनुमान मंदिराजवळ शनिवार, 27 नोव्हेंबर 2021 रोजी घडली होती. या प्रकरणी निखील राजपूतसह आठ जणांच्या टोळीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता मात्र संशयीत पसार झाले होते. निखील राजपूत हा श्रीराम नगरातील निवासस्थानी आल्याची माहिती बाजारपेठ पोलिसांना मिळाल्यानंतर सोमवारी सकाळी पोलिसांनी घरी जावून त्यास अटक केली व नंतर त्याची धिंड काढून बाजारपेठ पोलिस ठाण्यात आणण्यात आले.