भुसावळात प्रशासकीय वेळेचे उल्लंघण ; सहा दुकानदारांविरुद्ध गुन्हा

0

भुसावळ : कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर लॉकडाऊन व संचारबंदी सुरू असून प्रशासनाने दुकानदारांना दुकानांची वेळ ठरवून दिली आहे मात्र असे असताना वेळेच उल्लंघण केल्याने भुसावळातील सहा दुकानदारांविरुद्ध बाजारपेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. नगर अभियंता पंकज पन्हाळे यांच्या फिर्यादीनुसार हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शेख अब्दुला शेख रऊफ (जुनेद किराणा, खडका रोड), सुनील दिनकर बर्‍हाटे (अमर प्रॉव्हिजन, श्रीराम नगर, वांजोळा रोड), अब्दुल हमीद अब्दुल वसीम (ग्रीन पार्क), अनिल नंदकिशोर शर्मा (विग्नहर्ता प्रोव्हिजन, गांधी नगर) यांच्याविरुद्ध बुधवारी तर अन्य दोघा दुकानदारांविरुद्ध गुरुवारी बाजारपेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.