रेल्वेची मोहिम ; 40 निरीक्षकांकडून स्थानकावर धडक तपासणी
भुसावळ- फुकट्या प्रवाशांसह आरक्षण नसताना आरक्षित डब्यातून प्रवास करणार्या रेल्वे प्रवाशांविरूद्ध रेल्वे प्रशासनाने धडक मोहिम सुरू केली असून सोमवारी रेल्वे स्थानकावर 40 निरीक्षकांसह 13 रेल्वे सुरक्षा बल कर्मचार्यांनी राबवलेल्या विशेष मोहिमेत 354 केसेसच्या माध्यमातून एक लाख 53 हजार 780 रुपयांचा दंड वसुल करण्यात आला. रेल्वे प्रशासनाच्या कारवाईचा फुकट्या प्रवाशांनी चांगलाच धसका घेतला आहे.
डीआरएम यांच्या उपस्थितीत मोहिम
भुसावळ विभागाचे डीआरएम आर.के.यादव यांच्या उपस्थितीत सोमवारी सकाळी रेल्वे स्थानकावर विशेष मोहिम राबवण्यात आली. प्रसंगी मुख्य वाणिज्य प्रबंधक सुनील मिश्रा, सहाय्यक मंडळ वाणिज्य प्रबंधक अजय कुमार यांच्या उपस्थितीत 40 तिकीट निरीक्षकांनी तपासणी मोहिम राबवून 354 प्रवाशांवा कारवाई केली. विना तिकीट प्रवास करणार्या 138 प्रवाशाकडून 60 हजार 220 रुपये दंड, आरक्षित डब्यात प्रवास करणार्या 206 प्रवाशांकडून 91 हजार 850 तर लगेजचे तिकीट न काढता प्रवास करणार्या दहा प्रवाशाकडून एक हजार 710 रुपये दंड वसुल करण्यात आला. विशेष मोहिमेत बी.एस.महाजन, हेमंत सावकारे, प्रशांत ठाकूर, विवेन रॉड्रिक्स, एस.के.दुबे, आर.के.केसरी, मुन्ना कुमार, आर.के.गुप्ता व कर्मचार्यांचा सहभाग होता.