भुसावळ– शहरातील सचिनकुमार गणेश नवगाळे यांना जामनेर रोडवरील स्टेट बँकेच्या आनंद नगर शाखेच्या कॅशियर यांनी अश्लील शब्दात शिवीगाळ केल्याने बाजारपेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. नवगाळे हे बँकेत रोखेचा भरणा करण्यासाठी गेल्यानंतर त्यांना कॅशियर भास्कर तुकाराम सोनार (गायत्री नगर) यांनी अश्लील भाषेत शिवीगाळ केली. सोमवारी दुपारी ही घटना घडली. तपास ईरफान काझी करीत आहेत.