भुसावळ : शहरात कोरोनाचा वाढात प्रादुर्भाव लक्षात घेता शहरातील विविध भाग सील करावे लागत असून त्यासाठी अत्यावश्यक असलेल्या बॅरीकेटस्ची कमतरता असल्याने व कंटेन्मेंट झोनमध्ये लॉकडाऊनच्या नियमांचे अतिशय काटेकोरपणे पालन करण्याची गरज लक्षात घेता भुसावळ तालुका बिल्डिंग मटेरीयल व्यापारी असोसिएशन यांच्याकडून महाराष्ट्र पोलिस भुसावळ उपविभागाकडे 20 बॅरीकेट्स सुपूर्द करण्यात आलेत.
सामाजीक उपक्रमाचे सर्वत्र कौतुक
भुसावळचे पोलिस उपअधीक्षक गजानन राठोड व बाजारपेठ पोलिस निरीक्षक दिलीप भागवत यांना असोसिएशनतर्फे बॅरीकेट्स सुपूर्द करण्यात आले. याप्रसंगी असोसिएशनचे अध्यक्ष विकास पाचपांडे, उपाध्यक्ष पंडित भिरूड, प्रीन्स गुजराल, मनोज अगीचा, संजय काळे, पवन ओगले, सतीश ओगले, दीपक पाटील आदी उपस्थित होते.