भुसावळात बालिकेचा विनयभंग ; आरोपी शहर पोलिसांच्या जाळ्यात

0

भुसावळ- शहरातील हद्दीवाली चाळ भागातील 13 वर्षीय बालिकेचा विनयभंग केल्याप्रकरणी आरोपीला अटक करण्यात आली. सुशील दीपंकार वाघ ( 27) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे. हद्दीवाली चाळ भागातील 13 वर्षीय बालिका तिच्या घरासमोर सायंकाळी जेवणाचा डबा घासत असताना संशयिताने बालिकेशी अश्लील शब्दात संवाद साधला. पीडितेने शहर पोलिसात दिलेल्या फिर्यादीवरून शहर पोलिसात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला. तपास प्रभारी पोलिस निरीक्षक दीपक गंधाले यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक विशाल पाटील करीत आहेत. आरोपी शुक्रवारी मध्यरात्री अटक केल्यानंतर शनिवारी न्यायालयात हजर असता न्यायालयाने आरोपीला न्यायालयीन कोठडी सुनावली.