भुसावळात बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनानिमित्त विविध समाजपयोगी कार्यक्रम

0

गोरगरीब, गरजू लोकांना अन्नदान , फराळ वाटप , ब्लँकेट वाटप

भुसावळ- हिंदू हृदय सम्राट सरसेनापती तथा शिवसैनिकांचे आराध्य दैवत स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृती दिनानिमित्त शहर व पक्षहसरात जनतेच्या न्याय व हक्कासाठी बाळासाहेबांच्या कट्टर शिवसैनिकांच्या वतीने 17 नोव्हेंबर रोजी शहरात विविध भागात गोरगरीब, गरजू लोकांना अन्नदान, फराळ वाटप , ब्लँकेट वाटप यासह विविध समाजपयोगी कार्यक्रमांचे आयोजन केले. शहरातील बाजारपेठ पोलिस ठाण्यामोर बाळासाहेबांच्या प्रतिमेचे पूजन व माल्यार्पण करून आदरांजली वाहण्यात आली तर दुपारी 12 वाजता रेल्वे स्थानक परीरसरात गोरगरीबांना खिचडी (अन्नदान ) करण्यात आले तसेच दुपारी गरीब व अनाथ मुलांना फराळ वाटप करण्यात आले. शिवसेना माजी शहर प्रमुख स्व.सुभाष बागुल यांच्या घरासमोर तसेच शिवसेनेचे माजी जिल्हा प्रमुख अ‍ॅड.जगदीश कापडे यांच्या निवासस्थानासमोर स्व.बाळासाहेबांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले. गोर-गरीब गरजू निराधार वयोवृद्ध महिलांना ब्लँकेटचे वाटप करण्यात आले.

यांची कार्यक्रमास उपस्थिती
माजी जिल्हाप्रमुख अ‍ॅड.जगदीश कापडे, रेल कामगार सेनेचे विभागीय अध्यक्ष ललितकुमार मुथा, शिवसेना नगरसेवक मुकेश गुंजाळ, उपजिल्हा प्रमुख अ‍ॅड.श्याम श्रीगोंदेकर, ज्येष्ठ शिवसैनिक अशोक जाधव, दिवाकर विसपुते, राजेंद्र सातपुते, कडू चौधरी, कट्टर शिवसैनिक उमाकांत शर्मा (नमा), युवासैनिक मिलिंद कापडे, महिला आघाडी जिल्हा संघटक पूनम बर्‍हाटे, तालुका संघटक उज्वला बागुल, शहर प्रमुख भुराबाई चव्हाण, अनिता पवार, लक्ष्मी खरे, वैशाली विसपुते, जवाहर गौर, राकेश खरारे, राजेश ठाकुर, दिनेश बुंदेले, राजू लोहार, अमोल भालेराव, बालू भालेराव, पवन मेहरा, भरत परदेसी, बाळासाहेब भोई, अबरार शेख, मनोज पवार, गोकुळ बाविस्कर, बबलू धनगर, किशोर शिंदे, विक्की चव्हाण, परमेश्वर चव्हाण, योगेश बागुल, सुरज पाटील, शहर प्रमुख निलेश महाजन, सुधीर तायडे, विनोद गायकवाड, फिरोज तडवी, जग्गू खेराडे, नामदेव बर्‍हाटे, महेमूद भाई, शकील भाई, गणेश काळे, हितेश टकले, रफिक खान, सचिन शर्मा, सोनू पाटील यांच्यासह खासदार रक्षा खडसे, आमदार संजय सावकारे, नगराध्यक्ष रमण भोळे, युवराज लोणारी, दीपक धांडे, रवी ढगे, सचिन चौधरी, दुर्गेश ठाकूर, सचिन पाटील, राजेंद्र आवटे राजेंद्र नाटकर यांच्यासह असंख्य शिवसैनिक उपस्थित होते.