भुसावळ- शहरातील गांधी चौकातून पंकज राजेंद्र साळी (32, रा.म्युनीसीपल पार्क, भुसावळ) हा दुचाकी (एम.एच.19 बी.यु.3204) द्वारे बिअरची विना परवाना वाहतूक करताना आढळल्याने त्यास बाजारपेठ पोलिसांनी ताब्यात त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. आरोपीच्या ताब्यातून किंग फिशर स्ट्राँग बिअरच्या एकूण 24 बाटल्या जप्त करण्यात आल्या असून त्याची तीन हजार 960 रुपये किंमत असून सोबत 20 हजार रुपये किंमतीची दुचाकीही जप्त करण्यात आली. ही कारवाई पोलिस उपअधीक्षक गजानन राठोड व बाजारपेठ पोलिस निरीक्षक देविदास पवार यांच्या मार्गदर्शनाखाली एएसआय अंबादास पाथरवट, नाईक सुनील थोरात, दीपक जाधव, निलेश बाविस्कर, कृष्णा देशमुख, उमाकांत पाटी, राहुल चौधरी, सचिन पोळ आदींच्या पथकाने केली. या गुन्ह्याचा तपास नाईक दीपक जाधव करीत आहेत.