भुसावळात बेकरीत आढळले झुरळ अन किडे

0

अन्न व सुरक्षा विभागाच्या कारवाईत तीन हजारांचे टोस्ट जप्त

भुसावळ: शहरातील जाम मोहल्ला भागातील गोल्डन बेकरीत पायाने मैदा कुस्करून टोस्ट बनवले जात असल्याची तक्रार जळगावच्या अन्न व औषध प्रशासन विभागाकडे करण्यात आल्यानंतर गुरुवारी सकाळी सात वाजता अधिकार्‍यांनी या बेकरीत धाड टाकत तपासणी केली मात्र तक्रारीत तथ्थ आढळले नसलेतरी बेकरीच्या सर्वदूर अस्वस्वच्छता तसेच अन्न-पदार्थांजवळ झुरळ व किरकोडे आढळल्याने बेकरी चालकास नोटीस बजावण्यात आली तर 700 रुपये किंमतीचा मैदा नष्ट करून तीन हजारांचे टोस्ट जप्त करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.