भुसावळ- शहरातील जामनेर रोडवरील कृष्णा नगर, चैतन्य हॉस्पीटलजवळ बेकायदेशीररीत्या देशी दारूची विक्री करणार्या नरेंद्र गोविंदा ढाके यास रविवारी रात्री अटक करण्यात आली. आरोपीच्या ताब्यातून 30 हजार रुपये किंमतीची दुचाकी (एम.एच.19 सी.डी.6447) व दोन हजार 495 रुपये किंमतीची देशी दारू जप्त करण्यात आली. आरोपीविरुद्ध दीपक जाधव यांच्या फिर्यादीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला. ही कारवाई हवालदार लतीफ शेख, नीलेश बाविस्कर आदींनी केली.