गुरांची बेकायदा वाहतूक : भुसावळात 12 म्हशींना जीवदान

0

गो प्रेमींची सतर्कता ; कत्तलीच्या उद्देशाने होणारी वाहतूक पुन्हा ऐरणीवर

भुसावळ- आयशर वाहनातून गुरांची तस्करी होत असल्याच्या माहितीनंतर सतर्क गो प्रेमींनी वाहन अडवून 12 म्हशींची सुटका केल्याची घटना रविवारी दुपारी यावल नाक्यावर घडली. या प्रकरणी पोलिस कर्मचारी भूषण चौधरी यांच्या फिर्यादीवरून चालक हुसेन चॉँद खा पठाण (रा. सावदा) व त्याचा सहकारी (नाव माहित नाही) यांच्याविरुद्ध शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. आठवडाभरात गुरांची सुटका होण्याची ही दुसरी घटना असून यापूर्वी 24 रोजीदेखील गुरांची सुटका करण्यात आली होती.

गो प्रेमींच्या सतर्कतेने म्हशींना जीवदान
सावद्याकडून जळगावकडे जाणारी आयशर (एम.एच.20-ए.टी.8575) मधून गुरांची तस्करी होत असल्याचा संशय गो प्रेमी सोनू टाक, देवेंद्र चव्हाण, जितू जाट, रोहित महाले, विशाल टाक, सुमित झांबरे आदींना आल्यानंतर त्यांनी शहर पोलिसांना माहिती कळवली. शहर वाहतूक शाखेचे सहाय्यक पोलिस निरीक्षक दीपक गंधाले, शहर पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक के.टी.सुरळकर व सहकार्‍यांनी घटनास्थळी धाव घेत ट्रक चालकास गुरे वाहतुकीचा परवाना विचारला असता त्याने उडवा-उडवीची उत्तरे दिल्याने गुरांची कत्तलीच्या इराद्याने वाहतूक होत असल्याचे निष्पन्न झाल्याने पाच लाख रुपये किमतीची आयशर ट्रक, अडीच लाख रुपये किमतीच्या म्हशी असा साडेसात लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. 12 म्हशींची बियाणी मिलिटरी स्कूलमध्ये रवानगी करण्यात आली