भुसावळात बेबा भैय्या उर्फ देविप्रसाद शर्मा यांना स्मृतीदिनानिमित्त आदरांजली

0

शिक्षण व्यवस्थेतील अलौकीक कार्य आजही नागरीकांच्या स्मरणात -जे.टी.अग्रवाल

भुसावळ- सुशिक्षित समाजाबरोबरच संवेदनशील, सुसंस्कृत, सहृदयी आणि सक्षम समाज घडवण्यासाठीही शिक्षण आवश्यक असून या भावनेतूनच शिक्षण रूजवण्यासाठी मोठ्या व योग्य शिक्षण व्यवस्थाही असायला हवी या उद्देशाने हिंदी सेवा मंडळाचे तत्कालीन सचिव आदरणीय स्व. देवीप्रसाद शर्मा (बेबा भैय्या) यांनी निस्वार्थ मनाने कार्य केले. हिंदी सेवा मंडळ संचलित शाळा, महाविद्यालये त्यांच्या मार्गदर्शनाखाली विकसित झाली आणि त्यांची शैक्षणिक वाटचाल योग्य दिशेने चालल्याचा आनंद असल्याचे गौरवोद्गार हिंदी सेवा मंडळाचे अध्यक्ष जे.टी.अग्रवाल यांनी येथे काढले. हिंदी सेवा मंडळाचे भूतपुर्व महामंत्री, स्व.देवीप्रसादजी द्वारकाप्रसादजी शर्मा (बेबा भैय्या) यांच्या पाचव्या स्मृतीदिन कार्यक्रम रविवार, 11 रोजी श्री संत गाडगे बाबा आभियांत्रिकी महविद्यालयात झाला. प्रसंगी स्व.शर्मा यांच्या पुतळयास माल्यार्पण करण्यात आले. याप्रसंगी जे.टी.अग्रवाल बोलत होते.

सामाजिक कार्यामुळे अनेकांनी मानले गुरूस्थानी -अग्रवाल
बेबा भैय्या यांनी सामाजिक कार्यात स्वतःला झोकून दिले. निखळ चरीत्र, त्यागमय जीवन आणि गोरगरीबांबद्दलची अपार करुणा या त्रिसूत्रीवर त्यांचे कार्य उभारलेले होते. नगरपालिकेत नगरसेवक ते नगराध्यक्ष चढत्या कमानीने राजकीय ठसा त्यांनी उमटवला शिवाय अनेक सामाजिक कार्यकर्त्यांनी त्यांनी गुरुस्थानी मानले असल्याचेही जे.टी.अग्रवाल म्हणाले.

यांची होती उपस्थिती
प्रसंगी हिंदी सेवा मंडळाचे अध्यक्ष जे.टी.अग्रवाल, सचिव मधुलता शर्मा, उपाध्यक्ष व्ही.पी.ओगले, उपाध्यक्ष सत्यनाराण गोडयाले, कोषाध्यक्ष एम.डी.तिवारी, व्यायामशाळा चेअरमन पंकज संड, किर्ती संड, आरती भारद्वाज, रजनीश भारद्वाज, स्कूल कमेटी चेअरमन रमेशजी नागराणी, नंदलाल अग्रवाल, राजाराम शर्मा, गोपाळ अग्रवाल, बन्सीलाल अग्रवाल, नारायण रणधीर, संजय नाहटा, सुरजित सिंग गुजराल, कैलास अग्रवाल, संजय जोशी, अशोक पुरोहित, तसेच हिंदी सेवा मंडळाचे सर्व सभासद, अ‍ॅकडमीक डीन डॉ.राहुल बारजिभे, विभाग प्रमुख प्रा.सुधीर ओझा, डॉ.पंकज भंगाळे यांच्यासह हिंदी सेवा मंडळ संचलित सर्व महविद्यालय व विद्यालयांचे प्राचार्य, मुख्याध्यापक तसेच सर्व कर्मचारी वृंद हजर होते. सूत्रसंचालन डॉ. गिरीष कुलकर्णी यांनी केले.