भुसावळ- डॉ.श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या जयंतीचे औचित्य साधून भारतीय जनता पार्टीतर्फे नवमतदार नोंदणी व सदस्य नोंदणी अभियान राबवण्यात येणार आहे. शनिवारी सकाळी 10 वाजता आमदार संजय सावकारे यांचे संपर्क कार्यालय, जामनेर रोड, भुसावळ येथे या अभियानाची सुरुवात आमदार संजय सावकारे यांच्या हस्ते होईल. प्रमुख पाहुणे म्हणून नगराध्यक्ष रमण भोळे, जिल्हा सरचिटणीस प्रा.सुनील नेवे, उपनगराध्यक्ष सईदा शेख शफी, महिला आघाडी जिल्हाध्यक्ष शैलजा पाटील, गटनेते मुन्ना तेली व सर्व सन्माननीय नगरसेवक व पदाधिकारी उपस्थित राहतील. नवमतदारांनी व नागरीकांनी मतदार नोंदणीसाठी व सदस्य नोंदणीसाठी हजर रहावे, असे आवाहन शहराध्यक्ष पुरुषोत्तम नारखेडे, मतदार नोंदणी अभियान शहर संयोजक युवराज लोणारी, सहसंयोजक अनिकेत पाटील, सदस्य नोंदणी शहर संयोजक गिरीश महाजन, सहसंयोजक देवा वाणी यांनी केले आहे.