अनुप खोब्रागडेसह सात जणांना अटक : जुगाराचे साहित्य जप्त
भुसावळ : शहरातील पंचशील नगरमधील भाजपाच्या संपर्क कार्यालयात सुरू असलेला पत्त्याचा डाव पोलिसांनी उधळत सात जणांना अटक केली. रविवारी सायंकाळी झालेल्या या कारवाईनंतर मोठी खळबळ उडाली. पोलिसांनी रात्री उशीरा आरोपींची जामिनावर सुटका केली. सहाय्यक पोलिस अधीक्षक नीलोत्पल, बाजारपेठचे पोलीस निरीक्षक चंद्रकात सरोदे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार वसंत लिंगायत, संजय पाटील, कमलाकर बागुल, कॉन्स्टेबल संजय बडगुजर, रवींद्र बिर्हाडे व विकास सातदिवे यांच्या पथकाने पंचशील नगरातील भाजपा संपर्क कार्यालयात पत्त्याचा जुगार खेळणार्या अनुप खोब्रागडे, अजहर शेख, गोविंदा इंगळे, जतीन नरवाडे, महेश खरात, अनिल सोनवणे व चेतन मरसाळे यांना अटक केली तर दोन हजार 360 रुपये रोख व पत्त्याचा कॅट जप्त करण्यात आला. आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करून त्यांना अटक करून लागलीच त्यांची जामिनावर सुटका करण्यात आली.